top of page
Search

रंग माझा वेगळा

Writer: Gyro InfographicGyro Infographic

रंग बदलणारे सरडे/Oriental garden Lizard या नावाने ओळखले जाणारे हे सरडे, बिनविषारी असून आपले भक्ष्य कीटक इत्यादी तोंडाने पकडून खातात, त्यांना दात असूनही बहुदा ते भक्ष्य थेट झटके देत गिळून टाकतात. सध्या त्यांचा विणीचा हंगाम असल्याने त्यांतले नर असे रंगीत दिसतात, त्यांच्या घशाशी नारंगी काळा भाग दिसतो. कुंपणावरील झुडपांवर सकाळच्या सूर्यप्रकाशात ऊन खाताना किंवा भक्ष्याच्या शोधार्थ निश्चल बसलेले आढळतात. गडद रंगांमुळे आणि रंग बदलण्याच्या सवयीमुळे ह्यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत; पण हे सरडे बिनविषारी व निरुपद्रवी असून उलट बागेतील हानिकारक कीड-कीटक खाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचे आहेत.

Oriental garden lizard (Calotes versicolor)
रंग बदलणारा सरडा

 
 
 

Comments


bottom of page